जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / POSITIVE NEWS: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची कमाल, तयार केलं जीवसंरक्षक यंत्र

POSITIVE NEWS: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची कमाल, तयार केलं जीवसंरक्षक यंत्र

POSITIVE NEWS: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची कमाल, तयार केलं जीवसंरक्षक यंत्र

या अनोख्या यंत्रनिर्मितीबाबत अंकुश भागवतचे सर्व स्तरातून मोठं कौतुक केलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वाशिम, 23 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्यासह वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. तसंच 10 वी पर्यंतच्या सर्व परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. असं जरी असलं तरी बाल वैज्ञानिकांचा राष्ट्रीय मेळावा ऑनलाइन भरणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्याच्या (Washim District) कारंजा तालुक्यातील वढवी येथील आप्पास्वामी विद्यालय ही एकमेव शाळा सहभागी होणार आहे. बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती आणि विविध प्रयोगांचे विज्ञान प्रदर्शन देशातील आसाम, दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरवलं जात असे. मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रथमच ऑनलाइन पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकमेव वढवी येथील आप्पास्वामी विद्यालय या शाळेचा विद्यार्थी अंकुश भागवत याने सहभाग घेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेतील विद्यार्थ्याने पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवणारे जीव संरक्षक यंत्र तयार केले आहे. दरवर्षी पावसाळा आला की अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण होते. त्यामुळं तलाव, धरणं आणि नद्यांमध्ये अनेकांचे जीव जातात. हे जीव वाचवण्याची कल्पना अंकुश भागवत याला सुचली आणि त्यावर त्याने काम सुरू केले. त्यानं एका रबराच्या ट्यूबमध्ये बदल करून त्या रबरी ट्यूबला मोटर व फॅन जोडला. या ट्यूबला रिमोटच्या साहाय्याने हाताळलं जात असल्याने ते पाण्यात टाकताच अगदी काही वेळात ते पाहिजे तिथे पोहोचवता येते. हेही वाचा - S achin Vaze Case: स्कॉर्पिओतील स्फोटकांबाबत मोठा खुलासा; नागपूर कनेक्शनही उघड जर एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडत असला तर त्या बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत हे रबरी ट्यूब अगदी काही वेळात पोहोचवून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. या जीवसंरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक तुळजापूर नजीक असलेल्या धरणात आज करण्यात आले असून हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शाळेच्या शिक्षकांसह अनेक विद्यार्थी हजर होते. अंकुश भागवत हा ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याच्या बौद्धिक कौशल्याने त्याने हे जीव संरक्षक यंत्र बनविले आहे. हे यंत्र अनेकांचे जीव वाचविण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं अंकुश भागवतचे सर्व स्तरातून मोठं कौतुक केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात