Home /News /crime /

Sachin Vaze Case: स्कॉर्पिओतील स्फोटकांबाबत मोठा खुलासा; नागपूर कनेक्शनही उघड

Sachin Vaze Case: स्कॉर्पिओतील स्फोटकांबाबत मोठा खुलासा; नागपूर कनेक्शनही उघड

Sachin Vaze Case: मुंबईतील कार माइकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून NIA ने मोठा खुलासा केला आहे.

मुंबई, 23 एप्रिल: मुंबईतील कार माइकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून याचा संबंध आता राज्य सरकारच्या अखत्यारित सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाशी जोडण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेल्या 20 कांड्या त्याच जिलेटिनच्या कांड्या आहेत, ज्याचा वापर महामार्ग बनवण्याकरता केला जात आहे. या कांड्या नागपूरमधील एका कंपनीत बनवल्याचंही यापूर्वी उघड झालं आहे. संबंधित जिलेटिनच्या कांड्या स्कॉर्पिओ गाडीत कशा आल्या? किंवा या कांड्या सचिन वाझेला कोणी दिल्या?  याचा तपास NIA कडून केला जात होता. याप्रकरणी  NIA ने नुकतीच एका माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची चौकशी केली आहे. या चौकशीत ठाण्यातील एका व्यावसायिकाचा संबंध उघड झाला आहे. संबंधित माजी पोलीस अधिकाऱ्याचे ठाण्यातील व्यावसायिकाशी आणि सचिन वाझेशी घनिष्ठ संबंध आहेत. ठाण्यातील हा व्यावसायिक या महामार्गाच्या कामाशी संबंधित असून त्याला या महामार्गासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या चोरून आणणं सहज शक्य होतं. त्यामुळे या व्यावसायिकावर जिलेटिनच्या कांड्या आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच महामार्गाच्या कामातील 20 जिलेटीनच्या कांड्या संबंधित व्यावसायिकाने चोरल्या होत्या. तसेच या कांड्यांचा वापर कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्याकरता झाला होता. ठाण्यातील हा व्यावसायिक आधीपासूनच एनआयएच्या रडारवर होता. पण पुराव्याअभावी त्याला चौकशीसाठी बोलण्यात आलं नव्हतं. पण माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणांना या व्यावसायिकाच्या भूमिकेबद्दल अधिक स्पष्टता आली आहे. हे ही वाचा- Sachin Vaze: धमकीचं पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या ठेवणारा अखेर सापडला, NIA तपासात उलगडा या प्रकरणी आता संबंधित व्यावसायिकाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर माजी एन्काऊंटर स्पेशालिस्टचीही पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच कार माइकल रोडवरील स्कॉर्पिओप्रकरणी लवकरच संबंधित माजी पोलीस अधिकाऱ्यासह ठाण्यातील व्यवसायिकाला अटक करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Mumbai, Sachin vaze

पुढील बातम्या