'मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका', संजय राठोड यांची हात जोडून विनंती

'मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका', संजय राठोड यांची हात जोडून विनंती

'अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण..'

  • Share this:

वाशिम, 23 फेब्रुवारी : 'माझ्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन आहे. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करू नका, मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका' अशी विनंती शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. पण गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर असलेले संजय राठोड पोहोरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने समोर आले. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

'मी 15 दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. या काळात कोणतेही काम थांबले नाही. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका', अशी विनंती संजय राठोड यांनी केली.

'पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, पण या प्रकरणमुळे वाटेल ते आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही', असा दावा राठोड यांनी केला.

'या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही सत्य या चौकशीतून समोर येईल, ते सर्वांनी पाहावे', असंही राठोड म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या