मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंचायत समिती सदस्य ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, वाचा राजीव सावंत यांचा राजकीय प्रवास

पंचायत समिती सदस्य ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, वाचा राजीव सावंत यांचा राजकीय प्रवास

खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनानं निधन (Congress MP Rajiv Satav Passes Away) झालं आहे.  राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनानं निधन (Congress MP Rajiv Satav Passes Away) झालं आहे. राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनानं निधन (Congress MP Rajiv Satav Passes Away) झालं आहे. राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

  • Published by:  Kiran Pharate

पुणे 16 मे : खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनानं निधन (Congress MP Rajiv Satav Passes Away) झालं आहे. राजीव सातव यांची ओळख महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व आणि राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता अशी होती. पहिल्याच प्रयत्नात आमदार तर दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदार. पुढे काँग्रेसकडून राज्यसभेत खासदारकी आणि पुढील काळातील काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, अशी ओळख अॅड. राजीव सातव यांची होती. काँग्रेसच्या नव्या पिढीच्या नेत्यांमधील एक धुरंधर राजकारणी म्हणून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ते परिचित होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.

सातव यांना आपली आई आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. राजीव सातव यांच्या आई रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. राजीव सातव यांनी पुण्यात फर्ग्यूसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले होते. 2002 मध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले. 2007 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती झाले. 2009 मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. याच काळात त्यांनी आधी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम बघितले.

राजीव सातव यांना गांधी कुटुंबीयांच्या जवळील मानलं जातं होतं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विश्वासू म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. राजीव सातव राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य मानले जात. मोदींच्या लाटेतसुद्धा शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती.

काँग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे राजीव सातव यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी म्हणून काम बघण्याची संधी मिळाली होती. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहुल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले.

संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात असत. राजीव सातव यांना संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद असो की गुजरात विधानसभेच्या निवडणुका असो अथवा पंजाब राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकाविणे असो, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.

First published:

Tags: Congress, Coronavirus, Rajiv Satav