जळगाव, 26 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात (Kannad ghaat) दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित घाटातून अवजड वाहनं घेऊन जाण्यास निर्बंध लादण्यात आली आहेत. येथून केवळ लहान वाहनं सोडण्यास परवानगी आहे. असं असताना कन्नड घाटातून अवजड वाहनं सोडण्यासाठी पोलिसांकडून वसुली ( ) केली जाते, अशा प्रकारचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर, चाळीसगावचे भाजप आमदार (BJP MLA) मंगेश चव्हाण (Mangesh chavhan) यांनी स्टींग ऑपरेशन (Sting Operation) करत या बेकायदेशीर वसुलीचा भांडाफोड केला आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण हे स्वत: वेशांतर करून अवजड ट्रक चालवत कन्नड घाटात गेले होते. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी कन्नड घाटातून वाहन पुढे जाऊ देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली आहे. वेशांतर केलेल्या आमदारांनी आपण गरीब असून काही पैसे कमी करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. आरोपी पोलिसांनी वेशांतर केलेल्या भाजप आमदाराकडून 500 रुपयांची वसुली केली.
विशेष म्हणजे वसुली करणाऱ्या पोलिसांनी आमदारांना शिवीगाळ देखील केली आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. दरम्यान आमदारांनी पाचशे रुपये दिल्यानंतर, संबंधित पोलिसांकडे बाकीचे पैसे परत करण्याची विनंती केली. पण पोलिसांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आमदारांनी अन्य पोलिसांना ट्रकजवळ बोलावून संबंधित पोलीस उर्वरित पैसे देत नसल्याचं सांगितलं. यावेळी काही पोलिसांनी आमदारांना शिवीगाळ केली आहे.
हेही वाचा-SEX RACKET ची पोलखोल, आरोपीची 8 महिन्यांत 80 लाखांची कमाई; असा चालायला गोरखधंदा
यानंतर आमदारांनी ट्रकमधून खाली उतरून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आमदार चव्हाण यांना ओळखलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर आमदारांनी कन्नड घाटात आलेल्या अन्य ट्रकचालकांशी संवाद साधला. यावेळी पोलीस नेहमीच अशाप्रकारे ट्रकचालकांची अडवणूक करून पैसे वसुल करत अशी माहिती उपस्थित ट्रकचालकांनी दिली आहे. पोलिसांनी आमदारांकडून पाचशे रुपये वसूल केल्याची घटना समोर आल्यानंतर, परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jalgaon