मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

SEX RACKET ची पोलखोल, आरोपीची 8 महिन्यांत 80 लाखांची कमाई; असा चालायला गोरखधंदा

SEX RACKET ची पोलखोल, आरोपीची 8 महिन्यांत 80 लाखांची कमाई; असा चालायला गोरखधंदा

बांग्लादेशी तरुणींना (Sex racket exposed by police and bank accounts seized) भारतात आणून देहविक्रयाचा व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बांग्लादेशी तरुणींना (Sex racket exposed by police and bank accounts seized) भारतात आणून देहविक्रयाचा व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बांग्लादेशी तरुणींना (Sex racket exposed by police and bank accounts seized) भारतात आणून देहविक्रयाचा व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

  • Published by:  desk news

इंदूर, 25 नोव्हेंबर: बांग्लादेशी तरुणींना (Sex racket exposed by police and bank accounts seized) भारतात आणून देहविक्रयाचा व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बांग्लादेशातील गरजू मुलींना भारतात आणून त्यांची विक्री करण्याचं (Trafficking of Bangladeshi girls) काम ही टोळी करायची. या धंद्यातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांची कमाई केली होती. या प्रकरणी इंदूर पोलिसांनी 4 महिलांसह एकूण 5 आरोपींना (5 arrested including 4 women) अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या विजय दत्त उर्फ मोमिनुल रशीद याने दिलेली माहिती ऐकून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

असा चालायचा गोरखधंदा

ही टोळी बांग्लादेशमधून मुली आणून भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील दलालांना विकत असे. एका मुलीमागे त्यांना 25 हजार ते 1 लाख रुपये मिळत होते. या धंद्यातून आरोपी दत्तने गेल्या 8 महिन्यात तब्बल 80 लाख रुपयांची कमाई केली होती. आरोपीचं आयडीबीआय बँकेचं खातं पोलिसांनी सील केलं आहे. मुलीची विक्री केल्यानंतर पहिले तीन ते चार महिने हे आऱोपी त्यांच्या कुटुंबीयांना 5 हजार रुपये पाठवत असत. आपल्या मुलीला भारतात नोकरी लागली असून तिचं सर्व काही सुरळीत सुरू आहे, असं तिच्या पालकांना वाटत असे. त्यानंतर हे पैसे येणं बंद होई. मात्र तोपर्यंत आरोपींचं काम पूर्ण झालेलं असायचं.

असं हेरायचे सावज

बांग्लादेशमध्ये गरीब कुटुंब ही टोळी शोधत असे. कचरा वेचणारे कामगार अशा कुटुंबाची रेकी करून त्याची माहिती या टोळीला देत असत. त्यानुसार या कुटुंबांना भेटून ही टोळी कर्ज देत असे. हे कर्ज फेडू न शकणाऱ्या कुटुंबातील तरुणींना ते भारतात नोकरी करण्याची ऑफर देत. कर्ज झाल्यामुळे नोकरीची ही ऑफर तरुणी स्विकारत असत आणि भारतात येत असत.

पोलिसांनी वेष बदलून केला सौदा

इंदूरच्या विजय नगर पोलिसांनी वेष बदलून या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या महिला सहकाऱ्याला कॉल गर्ल असल्याचं भासवत सौदा करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक पोलीस कर्मचारी दलाल बनला आणि त्याने फोनवरून आरोपीशी सौदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषा आणि बोलण्याचा टोन वेगळा भासल्यामुळे आरोपीला संशय आला आणि सौदा रद्द करून तो मुंबईला पळून गेला.

हे वाचा - राजधानीत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांची एंट्री बॅन! CNG-इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी

16 वर्षं राहिला धर्म बदलून

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो एका हिंदू कुटुंबात तब्बल 16 वर्षं राहत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोमिनूल रशिद नावाचा हा आरोपी 1994 च्या दंग्यांनंतर भारतात आला आणि पश्चिम बंगालमध्ये एका कुटुंबात विजय दत्त नावाने राहिला. याच नावाने त्याने सर्व सरकारी कागदपत्रं तयार केले होते. पोलिसांनी या टोळीचा भांडाफोड केला असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bangladesh, Indore, Sex racket, West bangal