संगमेश्वर, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. स्थानिक पोलीस संगमेश्वर येते नारायण राणेंना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून नारायण राणे यांच्यासोबत पोलीस चर्चा करत आहेत. बंद खोलीत नेमकं काय सुरू आहे? याबाबतची जाणून घेऊयात इनसाईड स्टोरी.
भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी सांगितले की, स्थानिक पोलीस नारायण राणेंना ताब्यात घेण्यासाठी येथे आले आहेत. मात्र, आम्ही त्यांना विरोध केला आहे. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी आवश्यक असलेले अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांना केला. यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, माझ्यावर दबाव आहे मला दहा मिनिटात कारवाई करायची आहे.
मी पोलीस अधिक्षकांना विचारले की, तुमच्यावर कुणाचा तबाव आहे? जर तुम्ही अटक वॉरंट दाखवलं तर आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्यासोबत स्वत:हून गाडीत बसून येऊ. आम्हाला अटक वॉरंट दाखवलं नाही तरी चालेल पण महाराष्ट्राला तरी दाखवा असंही प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे.
कायद्याचं राज्य आहे, तुम्ही जे काही करत आहात ते कायद्याने करा. तुम्ही त्यांना अटक वॉरंट द्या, त्यांची सही घ्या, ते स्वत: येण्यासाठी तयार आहेत असंही प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane