मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात?

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात?

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

Narayan Rane detained by Police in Ratnagiri: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

संगमेश्वर, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याचं वृत्त समोर येत आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.

मुख्यमंत्री हे फार महत्त्वाचे पद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.

त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण...

महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.

काय म्हटले होते नारायण राणे?

जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.

First published:
top videos

    Tags: Narayan rane