Home /News /maharashtra /

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक; मुबंई, नाशकात कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड सुरु

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक; मुबंई, नाशकात कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड सुरु

Raj Thackeray: मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  मुंबई, 04 मे: मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर मनसेचे कार्यकर्ते (MNS workers) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याचं वृत्त समोर येत आहे. मुंबईत मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात मुंबईत अनेक मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यरात्री 1 वाजल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आहे. छपरीच्या तालीम परिसरातील श्री जबरेश्वर या छोट्या मंदिरासमोर हनुमान चालीसा लावून कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी अॅप्लिफायरसह इतर साहित्य जप्त केलं आहे. नाशकात पोलिसांचा चोख बंदोबस्त नाशिकमध्ये सर्वच मशिदीबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाही. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान झाली. नोटीस आणि पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप आल्याचं नाशकात पाहायला मिळालं. नाशिक शहरात केवळ दोन मशिदीमधून भोंग्याद्वारे पठाण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (mumbai police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. राज ठाकरे भोंग्याच्या भूमिकेवर ठाम, मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू, जोधपूरमध्ये दगडफेकीतून तणाव.. TOP बातम्या  'हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी "सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे' असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

  पुढील बातम्या