• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पिस्तुलीच्या धाकावर घरात घुसला अन् सिलेंडर स्फोटाची दिली धमकी, नगरमधील सिनेस्टाईल थरारक घटना

पिस्तुलीच्या धाकावर घरात घुसला अन् सिलेंडर स्फोटाची दिली धमकी, नगरमधील सिनेस्टाईल थरारक घटना

  • Share this:
अहमदनगर, 08 ॲाक्टोबर : अहमदनगर (ahamadnagar) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (police officer sandeep mitke) यांनी चित्रपटातील प्रसंगलाही लाजवेल अशा घडलेल्या घटनेत स्वता:च्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली. आरोपीने गोळीबार करूनही मिटके यांनी धाडसाने कारवाई पूर्ण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 तारखेला सकाळी डीग्रस येथे पीडित महिला आणि त्यांचे पती मुलगा व मुलगी हे त्यांचे राहते घरी असताना दबा धरून बसलेल्या आरोपी सुनील लोखंडे यांने मागील दरवाजाने घरात प्रवेश केला. पीडित महिला यांच्या मुलाच्या कमरेला पिस्तुल लावून मागोमाग घरात आला व त्याने आई कोठे आहे? तिला बाहेर बोलाव असे म्हणून आरडाओरड करू लागला. सदर ओरडण्याचा आवाज आल्याने पीडित महिला यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता आरोपी सुनील लोखंडे याने त्यांचे मुलास रिव्हॉल्वर लावून त्यास घरातील बेडरूमकडे घेऊन येत असताना दिसल्याने त्यांनी बेडरुमचा दरवाजा आतून लॉक केला. आरोपीने पीडित महिलेला बाहेर येण्यासाठी सांगून त्यांच्या मुलीच्या दिशेने एक गोळी झाडली. सदर गोळी तिच्या भावाच्या काना जवळून गेली. रिव्हॅालव्हरमधून गोळी झाडल्यानंतरही पीडित महिला यांनी दरवाजा उघडला नाही. हे बघून आरोपीने मी आता गॅस सिलेंडरच्या टाकीला गोळी मारून स्फोट घडवून आणतो, तू बाहेर ये मी तुला गोळी घालतो तू जर बाहेर आली नाही तर मी तुझ्या मुलांना व पतीला गोळ्या घालीन’ असा दम आरोपीने भरला. त्यावेळी पीडित महिलेनं Dy. s.p. संदीप मिटके यांना घटनेबाबत माहिती दिली आणि तात्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी विनंती केली. माहिती मिळताच घटनास्थळावर संदीप मिटके आणि पोलीस कर्मचारी पोहोचले. त्यानंतर घराला घेराव घालून आरोपीला शरण येण्यासाठी सांगितलं. परंतु आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदीप मिटके यांनी त्याला बोलण्यात गुंतवून त्याचे मतपरिवर्तन केले ‘ओलीस ठेवलेल्या मुलीस सोड वाटल्यास पिस्तुल माझे डोक्यावर ठेव’असे सांगून मुलीची सुटका केली. मुलगी दाराजवळ जाताच आरोपीचे लक्ष विचलित केले व धाडसाने आरोपीच्या अंगावर झडप घेऊन पिस्तुलाचा बॅरल पकडला व आरोपीस खाली दाबले. त्यावेळी आरोपीने एक गोळी झाडली. परंतु मिटके यांनी पिस्तुलाच्या बॅरल गच्च पकडून जमिनीचे दिशेने ठेवल्याने गोळी संदीप मिटके यांचे डाव्या पायाच्या पॅन्टला घासून गेली. तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या पथकाने संदीप मिटके यांचे मदतीस येऊन आरोपी जेरबंद करून त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई अतिशय संयमाने ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मिटके यांनी करून दाखवली. त्यांच्या या कामगिरीचे B.G.शेखर पाटील यांनी Dy.S.P.संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक केले.
Published by:sachin Salve
First published: