जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई, दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई, दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरचे विद्यमान महापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

सोलापूरचे विद्यमान महापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

Police action against Solapur deputy mayor rajesh kale: भारतीय जनता पक्षाचे राजेश काळे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. राजेश काळे यांच्यावर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 8 डिसेंबर : सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे (Solapur deputy mayor Rajesh Kale) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राजेश काळे हे भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) असून महानगरपालिकेत विद्यमान उपमहापौर म्हणून कार्यरत आहेत. महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ केल्याने उपमहापौर राजेश काळे हे चर्चेत आले होते. खंडणीसह विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमुळेच सोलापूर पोलिसांनी उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी तडीपार घोषित केलं आहे. सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांना दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. वाचा :  महापौरांवरील टीका शेलारांना भोवणार? रुपाली चाकणकरांनी दिले पोलिसांना आदेश सोलापूर, उस्मानाबादमधून तडीपार सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साद्य़ करण्याच्या हेतून राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाह्य पद्धतीने काम करण्यसाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरिक  आणि व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणे करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरिकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करत असातना सुद्धा धाकदपटशा दाखवण्याच्या  उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये यासाठी अंगावर जाणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या राजेश काळे याला सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे. न्यायालयात दाद मागणार आपल्यावर राजकीय द्वेषातून खोटे आरोप झाले आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाई करण्यात आलेली असल्याचा दावा उपमहापौर राजेश काळे यांनी केला आहे. तसेच याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही राजेश काळे यांनी म्हटलं आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपाडीची कारवाई कऱण्यात आली आहे. त्यासोबतच सेटलमेंट परिसरात राहणाऱ्या चेतन गायकवाड याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. चेतन गायकवाड याच्यावरही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे चेतन गायकवाड याच्यावर दाखल आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , crime , solapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात