जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंतप्रधान मोदींना 'नटसम्राट' व्हायचे असेल तर सिनेमात जावे, नाना पटोलेंचा घणाघात

पंतप्रधान मोदींना 'नटसम्राट' व्हायचे असेल तर सिनेमात जावे, नाना पटोलेंचा घणाघात

पंतप्रधान मोदींना 'नटसम्राट' व्हायचे असेल तर सिनेमात जावे, नाना पटोलेंचा घणाघात

पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीच्या पवित्र अशा वास्तूमध्ये आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे हे चुकीचे होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 10 फेब्रुवारी : ‘मोदी यांची तुलना नटसम्राट (natsamrat) यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं’ अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिल्ली दौरा आटोपून नागपुरात परतलेल्यानंतर नाना पटोले यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ‘भाजपने देशाच्या जनतेला राष्ट्रभक्ती शिकवण्याचे काम करू नये. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीच्या पवित्र अशा वास्तूमध्ये आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे हे चुकीचे होते. मोदींनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली. तसंच, ‘काळे कायदे आणून शेतकऱ्यांना आंदोलनास भाग पाडले आहे. शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्यावर टीका करण्याची जी काही प्रथा मोदींनी सुरू केली आहे, त्यांचे राष्ट्रप्रेम आता उघडे पडले आहे’, अशी टीकही नाना पटोले यांनी केली. ‘राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी हे भावुक झाले होते, पण ज्यावेळी 26 जानेवारीला शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केले होते, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना त्रास दिला होता आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यत अश्रू आले होते, हे भाजपच्या नेत्यांना दिसले नाही का? राज्यसभेत मोदी यांनी मगरीचे अश्रू ढाळले होते. त्या सगळ्या गोष्टी देशातील लोकं ओळखून आहे. त्यांची तुलना जर नटसम्राटाशी केली तर शब्द अपुरा पडणार नाही, त्यांना नटसम्राट राहायचं असेल तर त्यांनी कुठल्या सिनेमात जावे, पण लोकशाहीमध्ये असा ड्रामा आता कुणी सहन करणार नाही, अशी विखारी टीकाही पटोले यांनी केली. दरम्यान, नाना पटोले प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर  आज  पहिल्यांदा नागपूरला आले. विमानतळावर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी, टेकडी गणपती, ताजबाग येथे दर्शन घेऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आजच्या या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने कोरोना आचारसंहितेच्या सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतांना पाहायला मिळाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात