मुंबई, 19 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. या ठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये 12,600 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 चे उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी मागच्या अडीच वर्षात कोणताही विकास झाल्या नसल्याचे सांगत. सहा महिन्यात झालेल्या कामाचा पाढाच वाचला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाविकासआघाडी सरकार असताना किती विकास झाला हे तुम्हाला माहिती आहे. लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, यातून मुंबईकरांची आणि राज्याची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली, ती मोदींमुळे मिळाली आहे. येत्या दोन-अडीच वर्षात मुंबईचा कायापालट होईल. ऑक्टोबर 2015 साली पंतप्रधानांनी याच मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं, आज त्यांच्याच हस्ते या सेवेचं लोकार्पण होणार आहे, हा दैवी योग असल्याचेही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा : Video : मोदींच्या मुंबईमधील सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली
मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम होऊ नये, अशी अनेकांची इच्छा होती, पण नियतीसमोर कोणाचंही काहीही चालत नाही. पण याचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हावं अशी मुंबईकरांची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचं जिव्हाळ्याचं नातं होतं.
हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा दोघांचा समान धागा आहे. मेट्रोच्या कामाला देवेंद्रजींमुळे चालना, पण मागच्या अडीच वर्षात काय झालं त्यात मी जात नसल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
हे ही वाचा : दावोसमध्येही मोदींच्या नावाची चर्चा - मुख्यमंत्री
मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय पण काही जण यात खोडा घालण्याचं काम करत आहेत. 25-30-40 वर्ष या रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, त्यामुळे काहींचे धंदे बंद होतील, हे दु:ख होत आहे. तर काहींची पोटदुखी सुरू झाली आहे, मळमळ सुरू झाली आहे, छातीत धडकी भरली आहे. 6 महिन्यात हे एवढं काम करत आहेत, तर अडीच वर्षात काय करतील. जेवढी टीका कराल त्याच्या दहा पट काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.