मुंबई, 22 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. वेदांता-फॉक्सकॉनंतर फोनपे ही कंपनीही महाराष्ट्र सोडणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. PhonePe ने मुंबईचे ऑफिस बंद केलेले नाही किंवा महाराष्ट्रातून ऑफिस हटवलेले नाही, फक्त PhonePe चे रजिस्टर्ड ऑफिस मुंबईहून बदलून बंगळुरू मुख्यालय केले आहे, अशी अधिकृत प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.
एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मुंबईतील फोनपे कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येत असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. फोनपेचं मुंबईतलं नोंदणीकृत कार्यालय बंगळुरूला नेण्याबाबत ही जाहिरात होती, पण फोनपे महाराष्ट्र सोडणार नसून, फक्त कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय बदलण्यात आलं आहे.
हे ही वाचा : Spicejet च्या स्टॉक धारकांना डबल धक्का! गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी
फोन पेने दिलेल्या जाहीर नोटिशीत काय म्हंटले आहे…
याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की कंपनीने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यास सक्षम होण्यासाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. ज्यासाठी कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफारची पुष्टी मिळावी यासाठी 16 ऑगस्ट, 2022 येथे झालेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला.
हे ही वाचा : रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई
कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एकतर MCA21 पोर्टल (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करू शकते किंवा कारण देऊ शकते. किंवा रजिस्टर पोस्टाने त्याचे/तिचे हिताचे स्वरूप सांगणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह समर्थित आणि विरोधाच्या कारणासह असलेले पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग कडे एव्हरेस्ट 5 वा मजला 100 मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र- 400002 या पत्यावर, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याच्या प्रतिसह अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Maharashtra News, Mumbai, Phone