पिंपरी चिंचवड, 23 नोव्हेंबर : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Satara district central co operative bank election) पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( BJP MLA Laxman Jagtap) यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब (Petrol bomb attack ) फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने पेट्रोल बॉम्ब फेकून पळ काढला.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्या कार्यालयावर अज्ञाताकडून पेट्रोल बॉम्ब हल्ला pic.twitter.com/wb71oFNRtt
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2021
शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकल्या गेले. एका मोपेडवर आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले. एकूण दोन बॉम्ब फेकण्यात आले होते. पेट्रोल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सांगवी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण माहिती घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक रवाना केले आहेत. दरम्यान, हा हल्ला कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला हे अजून स्पष्ट न झाल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.