मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकं बघायला म्हणून गेले आणि सिलेंडरचा झाला भीषण स्फोट, ठाण्यातला VIDEO

लोकं बघायला म्हणून गेले आणि सिलेंडरचा झाला भीषण स्फोट, ठाण्यातला VIDEO

जखमी लोकांना तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • Published by:  sachin Salve

ठाणे, 10 जानेवारी : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात (Thane wagle estate) एका दुकानाला भीषण आग लागली होती. आग विझवत असताना अचानक सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत  ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या 2 कर्मचाऱ्यांसह 7 जण जखमी झाले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास 1 दुकानाला आग लागली होती. दुकानाला आग लागल्यानंतर जवळच असलेली 2 घरे आगीच्या भक्षस्थानी सापडली. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केलेले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे काम तातडीने सुरू केले. यावेळी स्थानिक लोकांनी एकच गर्दी केली होती.

आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एका सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 2 कर्मचारी आणि स्थानिक लोकं जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याची तीव्रता दूरपर्यंत जाणवली. स्थानिकांची एकच धावपळ उडाली होती.

जखमी लोकांना तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत स्पेअर्स पार्टचे दुकान आणि त्याला लागून असल्याच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

First published:

Tags: ठाणे