जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकमध्ये भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन, पाहा काय आहे खास Video

नाशिकमध्ये भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन, पाहा काय आहे खास Video

नाशिकमध्ये भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन, पाहा काय आहे खास Video

Nashik News : या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 18 मार्च : नाशिक शहरात प्रथमच देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त युनायटेड वि स्टँड फाउंडेशन आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे 18 आणि 19 मार्च असे दोन दिवस भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन सैन्य दलातील शस्त्र पाहावीत त्यांचा अभ्यास करावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शस्त्र जवळून बघण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांना अनुभवता येणार आहे. केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले आहे. इतर नागरिकांना लष्कराचे कार्य कसे चालते हे माहीत नसते. यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची शस्त्र नागरिकांना जवळून पाहायला मिळणार आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय पाहायला मिळणार? या प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकिय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे आहेत. यासोबतच रायफल्स, रॉकेट लांउचर्स, इंडियन फिल्ड गन, बोफोर्स, धनुष, 105 एमएम गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार असल्याची माहिती युनायटेड वि स्टँड फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले यांनी दिली आहे. संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनात तरूणांना सैनिकांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. अग्नीवीर भरती मार्गदर्शनही या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

    Nashik Wholesale Market : नाशिकमधील सर्वात स्वस्त मार्केट, फक्त 40 रुपयांमध्ये मिळतात मुलांचे कपडे, Video  

    सिम्फनी  बँण्डचे खास आकर्षण याचबरोबर या प्रदर्शनात आर्मी सिम्फनी बँण्डचे खास आकर्षण असणार आहे. प्रदर्शनात आर्मी सिम्पनी बँण्ड सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी मिलिटरी बँण्डचे वादन करण्यात येणार आहे. या वेळेत बघा प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 9 पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना बघता येणार आहे. शनिवार रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू असेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात