जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया....

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया....

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया....

मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 ऑगस्ट : अखेर 34 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या विस्तारावर आक्षेप नोंदवला आहे. आज एकूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या विस्तारात अनेकांना संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकार आपली नाराजी व्यक्त केली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर कही खुशी कही गम, भाजप कार्यालयातही शुकशुकाट काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवर कोणत्याही भाजप नेत्याचं नाव नव्हतं. यापूर्वीही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानलं जात होतं. मात्र पक्षाकडून त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली नाही.

जाहिरात

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली. भाजपकडून गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदेंकडच्या शंभूराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात