मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नंग्या तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली अटक

नंग्या तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली अटक

हातात तलवार घेऊन एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हातात तलवार घेऊन एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हातात तलवार घेऊन एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पंढरपूर, 9 जानेवारी : पंढरपूर तालुक्यातील आढीव इथं तलवार हातात घेऊन एका तरुणाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सागर हिंदुराव पासले (वय 30, रा. आढीव, ता. पंढरपूर) याला पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आढीव येथील सागर पासले हा हातात तलवार घेऊन फिरवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना आपल्या खबऱ्यामार्फत या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला खासगी वाहनाने आढीव गावात पाठवले. त्यानंतर सदर तरूणाला अटक करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळेच्या समोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेऊन उभा असलेला दिसला. त्यास गराडा घालून पोलिसांनी ताब्यात घेतलं. सागर हिंदुराव पासले याच्याकडे शस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना नाही. तरीही तो लोखंडी तलवार बेकायदेशीर जवळ बाळगलेल्या परिस्थितीत आढळून आला. यामुळे त्याच्याविरुध्द शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 सह महापोलीस कायदा कलम 135, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो फौ. अशोक जाधव करत आहेत.

First published:

Tags: Pandharpur (City/Town/Village), Pandharpur news