राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 28 जुलै : तीन महिन्यांपूर्वी 3 कोटी रुपये निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाचा दोन्हीकडचा भाग पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. डहाणूतील सूर्या नदीवर असलेला उर्से आणि पेठ या गावांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला. तीन कोटी रुपये निधी खर्च करून डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधला होता. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या स्थानिकांच्या अनेक तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, या पावसाने आता याचे पितळ उघड पडले आहे.
Palghar : कोट्यवधींचा पूल पहिल्याच पावसात गेला वाहून pic.twitter.com/V2eKEyWk0O
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2023
पावसाने उघड पाडलं ‘काम’ पालघर जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून यामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सूर्या नदीला पूर आल्याने तीन महिन्यांपूर्वी तब्बल 3 कोटी रुपये निधी खर्च करून उभारलेला उर्से - पेठ या गावांना जोडणाऱ्या पुलाचा दोन्हीकडचा भाग वाहून गेला आहे. सूर्या नदीवर उर्से आणि पेठ या ठिकाणी डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 कोटी रुपये निधी खर्च करून पूल उभरला होता. जून महिन्याच्या सुरुवातीलाच या पुलाचे काम पूर्ण झालं असून हे काम सुरू असताना काम निकृष्ट दर्जाच होत असल्याच्या स्थानिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, डहाणू सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येतोय. वाचा - मृत्यूनंतरही मरण यातना! चिता जळत असतानाच आला पूर, पुढे घडलं भयानक; पालघरमधील घटना या पुलाच्या उभारणीच काम शिवशाही कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं असून सध्या या पुलाच्या दोन्हीकडचा भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे उर्से, म्हसाड, सायेसह परिसरातील नागझरी आणि बोईसर येथे जाणारी विद्यार्थी तसच बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार यांना 18 पेक्षा जास्त किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे. ठेकेदाराने दोन्ही बाजूला केलेला भराव हा निकृष्ट दर्जाचा असून योग्य पद्धतीने न केल्याने हा संपूर्ण भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीच काम तातडीने करून ठेकेदारावर योग्य पद्धतीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. सूर्यानदी प्रमाणेच दिवशी येथील साखळतोड नदीवरचा पूल देखील वाहून गेल्याने कलमपाडा, पाटील पाड्यासह काही पाड्यांचा मुख्य बाजारपेठेची संपर्क तुटलाय. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आजही अनेक गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालेला पाहायला मिळतंय.