जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Palghar Rain Update : मृत्यूनंतरही मरण यातना! चिता जळत असतानाच आला पूर, पुढे घडलं भयानक; पालघरमधील घटना

Palghar Rain Update : मृत्यूनंतरही मरण यातना! चिता जळत असतानाच आला पूर, पुढे घडलं भयानक; पालघरमधील घटना

मृत्यूनंतरही मरण यातना!

मृत्यूनंतरही मरण यातना!

Palghar Rain Update : पालघर जिल्ह्यात चितेवर ठेवलेला मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.

  • -MIN READ Palghar,Thane,Maharashtra
  • Last Updated :

राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 28 जुलै : गेल्या दोनचार दिवसात पालघर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी नाले ओसांडून वाहत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंत्यसंस्कारासाठी चितेवर रचलेला मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेला. पालघरमधील आवढानी डुकले पाडा येथे ही घटना घडली. मयत विष्णु शेलार यांचा चितेवर मृतदेह ठेवला होता. पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. नाल्याला अचानक पूर आल्याने मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पालघरमध्ये मूलभूत सोयी सुविधा नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. काय आहे घटना? मनोर जवळील आवढाणीतील डुकले पाडा येथे विष्णू शेलार या ज्येष्ठ ग्रामस्थांवर हात नदीजवळ अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, या नदीला अचानक पूर आल्याने चिता मृतदेहासह वाहून गेली. डुकले पाडा येथे आदिवासी बहुल असलेल्या पाड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे मुसळधार पावसात या मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू होते. यावेळी मृतदेह अर्धवट जळाल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. या नदीलाही मोठा पुर आला. त्यामुळे हा मृतदेह चितेसह वाहून गेला असून या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर आजही स्मशानभूमी नाही तसेच ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मरणानंतर ही मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचा धक्कादायक चित्र वारंवार समोर येत आहे. मात्र, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपा केला जात आहे. वाचा - राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार की वाढणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट पालघरमध्ये पूरपरिस्थिती सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास दोन धरणातून एकत्रित रित्या 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू असून यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. सूर्या नदी आपली धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात