परमेश्वर सोनावणे, प्रतिनिधी उस्मानाबाद, 14 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू होण्यासाठी कठीण परिश्रमांची गरज असते. उस्मानाबादमधील एक तरुण हेच स्वप्न बघून दररोज 21 किलोमीटर धावतोय. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला सलूनमध्ये काम करावे लागत आहे. परिस्थितीशी संघर्ष करत ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचे शुभम भोसले असे नाव आहे.
शुभम मूळचा सोलापूरचा शुभम भोसले हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील यमगरवाडीचा आहे. त्याचे वडील लहानपणीच गेले. त्यानंतर आईनेच चार भावंडांचा सांभाळ केला. मोलमजुरी करून कशीबशी गुजराण होत होती. परंतु, शिक्षणासाठी खर्चायला पैसे नव्हते. अशा संघर्षात शुभमने शिक्षण सोडले नाही. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने शिक्षण सुरूच ठेवले. मात्र, त्याची खरी आवड ही खेळात होती. त्याला धावपटू व्हायचे होते. Success Story: हमालाचा मुलगा बनला ‘इंजिनिअर पिझ्झावाला’, पाहा Video दररोज 21 किलोमीटरची दौड शुभमला आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपटू व्हायचे आहे. त्यासाठी तो दररोज 21 किलोमीटर धावतो. परंतु, परिस्थितीमुळे त्याला पूर्णवेळ सराव करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने पार्टटाईम नोकरी करण्याचा निर्णय घेतला. उस्मानाबादमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असतानाच त्याने पार्टटाईम काम शोधले. तो एका कटिंग सलूनमध्ये काम करतो आणि मिळणाऱ्या पैशातून आपली दिनचर्या चालवतो. सोबत शिक्षणासाठी त्याचा लहान भाऊही राहत आहे. Success Story : इंजिनिअर तरुण पोहे व्यवसायातून कसे बनले करोडपती? पाहा Photos विविध मॅरेथॉन स्पर्धांत विजेता शुभम राज्यभरातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावला आहे. तसेच या मॅरेथॉनमध्ये त्याला बक्षीसेही मिळाली आहेत. विविध स्पर्धांमध्ये मिळालेल्या ट्रॉफी आणि मेडल त्याच्याकडे आहेत. तर बक्षिसांच्या रकमेतून तो स्वत:ची खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलात? हा पर्याय करा ट्राय, Video मदतीची गरज शुभमचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न आहे आणि तो त्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, त्याला आर्थिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. “घरच्या आर्थिक स्थितीमुळे आर्थिक अडचणी आहेत. तरीही मी सर्व प्रकारचे प्रयत्न करून देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करणार आहे,” असे शुभम म्हणतो.