मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तू मुंबईत पोरी घेऊन फिरतोस' भाजप आमदाराच्या मुलाने ओमराजेंना भरला दम

'तू मुंबईत पोरी घेऊन फिरतोस' भाजप आमदाराच्या मुलाने ओमराजेंना भरला दम

ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली

ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली

ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Osmanabad, India

उस्मानाबाद, 04 डिसेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहण्यास मिळाली होती. त्यानंतर आता ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्या वादात राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी उडी घेतली. 'ओमराजे औकातीत रहा आणि आम्ही तुझी राहते, घर पुण्यातील फ्लॅट आणि शेती हे माझ्या आजोबाने आम्ही दान केले. तू मुंबईत पोरी घेऊन फिरतोस' अशा एकेरी भाषेत ओमराजेंवर हल्लाबोल केला.

उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ बनवत ओमराजे निंबाळकर यांना औकातीत रहा आम्ही तुझे राहते घर शेती पुण्यातील फ्लॅट हे माझ्या आजोबांनी दान केले आहे. तू मुंबई पोरी घेऊन फिरतोस. पाटील कुटुंबाला तुझी अंडी पिले माहीत आहेत. त्यामुळे तू औकातीत राहा, आम्ही संस्कारी लोक आहोत म्हणूनच शांत राहिलो इथून पुढे तू जर काय करशील तर तुझी गाठ मल्हार पाटलांशी असणार आहे असा दम देखील मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिला आहे.

नेमका वाद कशावरून पेटला?

शनिवारी 2022 च्या पिक विमा संदर्भातल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासमोरच खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्या खडाजंगी झाली होती. राणा पाटील यांच्याकडून ओमराजेंचा ए बाळा असा एकेरी उल्लेख तर ओमराजेचेही राणा पाटील यांना तुला बोलत नसल्याचे एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले होते. प्रशासन शेतकरी यांच्यासमोरच दोन्ही भावांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला होता.

(भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा)

2020 सालच्या पीक पिक विमा अनुदानाचा विषय सुरू असतानाच जिल्ह्यात आता 2022 पिक विमा वाटपावरून गोंधळ सुरू झाला आहे. शासकीय विमा कंपनीने पंचनामे करताना वेगळे केले, मदत करताना मात्र उन्नीसबीस केल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर व शेतकऱ्यांनी केला आहे. यावरूनच आता मोठं रणकंदन झालं.

(..तर शिंदे सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, संजय राऊतांचा दावा)

2020 सालच्या पीकम्यावरून मोठं वादळ उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेले सर्वोच्च न्यायालय ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत हे वादळ धडकलं आहे. या पीक विम्याची पैसे मिळत नाही तोपर्यंतच 2022 सालच्या पीक विम्याचे 257 कोटी पैसे वाटप प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र हे वाटप सुरू करताना विमा कंपनीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे सर्वे केलेत त्याच प्रत्यक्षात मदत करताना मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने मदत केली जात आहे. एका शेतकऱ्याला 18000 हजार रुपये तर त्याच बाजूच्या शेतकऱ्याला आठ हजार रुपये अशी मदत विमा कंपनीने केली असून बजाज अलायन्स विमा कंपनीपेक्षा आता राज्य शासनाने नेमलेल्या सरकारी कंपनीने शेतकऱ्याला लुटले असल्याचा आरोप उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

First published:

Tags: Marathi news