जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवार हातात कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर; कांदा, कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक

अजित पवार हातात कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर; कांदा, कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधक.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधक.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : राज्यात कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, हाच मुद्दा विरोधकांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लावून धरला. या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे विरोधकांनी यावेळी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकरी विरोधी सरकारचा विरोध असो, असे बॅनरही यावेळी विरोधकांनी झळकावले. तर पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांना कांद्याची माळ दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल -  कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अहमदनगरच्या नेप्तीच्या कांदा बाजारात कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये दर मिळत आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इतर राज्यात वाढलेले कांद्याचे उत्पादन, कांद्याची घटलेली मागणी या सगळ्यामुळे खूप हाल झाले आहेत. 100 किलो वांग्यांचे 66 रुपये, 500 किलो कांद्यामागे 2 रुपये; बळीराजाने जगावं तरी कसं? सरकारचे कांदा निर्यात धोरण यामुळे कांद्याचे दर घसरल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर कांद्याची लागवड ही 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच लाल कांदा हा जास्त काळ टिकत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला जात आहे. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करताना स्थानिक बाजारात आडत, ट्रक भाडे , हमाली द्यावी लागते. विक्रीच्या वेळीही हा खर्च द्यावा लागतो त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना जास्त भाव देऊ शकत नाही असं व्यापारी सांगतात. तर यंदा महाराष्ट्रासह इतरही राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने हा परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: onion
  • First Published :
जाहिरात
जाहिरात