मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके; वडिलांचे छत्र हरवल्याने सुरू केला व्यवसाय

Osmanabad : खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके; वडिलांचे छत्र हरवल्याने सुरू केला व्यवसाय

ओम गुळवे

ओम गुळवे

ओम लहान असताना एका दीर्घ आजाराने वडील हिरावले. घरची परिस्थिती हलाखीची असताना आणि सोमनाथ यांच्या जाण्याने पत्नीवर दु:खाचा डोंगरच कोसळा. पती गेल्यानंतर यशोदा यांचा खरा संघर्ष सुरू झाला.

    उस्मानाबाद, 13 ऑगस्ट : खेळण्या-बागडण्याच्या वयात वडिलांचे छत्र हरपल्याने 14 वर्षीय चिमुकल्याला शिक्षणासह (Education) हातांना काम करावं लागत आहे. काम केलं नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही. जगण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी भूम शहरातील ओम या मुलाची तारेवरची कसरत सुरू आहे. घर चालवण्यासाठी कोवळ्या वयात ओम पेढे विक्रीचा व्यवसाय (Business) करतो. भविष्यात जिल्हा अधिकारी (Collector) होण्याचे स्वप्न ओमचे आहे. आजच्या युगात जीवन प्रवास करणे हा सोपा नाही. जीवन म्हणजे रोज एक नवे युद्धच आहे. कोरोनाच्या संकटात अनेक लहानग्यांच्या डोक्यावर छत्र हरपलं. अनेक मुलं अनाथ झाली. या मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आई-वडलाविना या जगात अस्तित्व निर्माण करणे म्हणजे मोठी कसरतच. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला पोहचत आहे. अशातच शिक्षण आणि घर चालविणे अवघड झाले आहे. ओम गुळवे हा 14 वर्षाचा शाळकरी विद्यार्थी आहे. भूम शहरातील सरकारी शाळेत तो इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेतो. ओमचे संपूर्ण नाव हे ओम सोमनाथ गुळवे. ओम लहान असताना एका दीर्घ आजाराने वडील हिरावले. घरची परिस्थिती हलाखीची असताना आणि सोमनाथ यांच्या जाण्याने पत्नीवर दु:खाचा डोंगरच कोसळा. पती गेल्यानंतर यशोदा यांचा खरा संघर्ष सुरू झाला. वयोवृद्ध सासू सासऱ्यांसह दोन मुलांची जबाबदारी अंगावर येऊन पडली. महागाईच्या काळात घर चालविणे आणि दोन मुलांचे संगोपन करण्याचे आवाहन सोमनाथ यांच्या पत्नी यशोदा यांच्या समोर होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि निम्यात राहिलेला संसाराचा अर्धवट गाडा पुढे चालविण्यासाठी यशोदा यांनी पेढे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. हेच पेढे शाळेच्या शिक्षणासह ओम विक्री करतो. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई शाळा सुटल्यानंतर पेढे विक्री  आपली आई आपल्या चांगल्या भविष्यासाठी एवढे कष्ट करत आहे. याची जाणीव ठेऊन ओम हा शाळा संपल्यानंतर आईला कामात हातभार लावतो. आई जेंव्हा पेढे विकण्याचे काम करते तेंव्हा ओम नारळ विकण्याचे काम करतो. ओम अभ्यासातही खूप हुशार असल्याचे त्याचे मित्र सांगतात. यावर्षी तिमाही परीक्षेतही त्याला चांगले गुण आलेत. भविष्यात जिल्हा अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. ज्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर इतर मुले एक्स्ट्रा क्लासेसला जातात, खेळण्यासाठी जातात त्या ठिकाणी ओम आपल्या आईला कामात हातभार लावतो. शिक्षण करून, नोकरी करून आईला आनंदी ठेवायचे आहे, असे ओमचे म्हणणे आहे. हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई जवाबदारी कष्ट करायला भाग पाडते पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. स्त्रियांच्या वैयक्तिक ओळखीपेक्षा वडील किंवा पतीच्या नावाने ओळखले जाते. मात्र, डोक्यावरील पतीचे छत्र हरपल्यानंतर स्वत:ची ओळख निर्माण करून जगणे कठीण आहे. आधी एवढे काही जास्त घराबाहेर पडत नव्हते. त्यांच्या जाण्यानं आमच्यावर संकट कोसळलं. आता माझ्याशिवाय घर कोण चालवणार? शेती करायला शेतीही नाही. घरखर्च, लेकरांचा खर्च, आजारपण अशा सगळ्या गोष्टी आहेत. जगणं खूप अवघड होत. अशा स्थितीवर मात करत व्यवसाय सुरू केला यात माझा मुलगा देखील मला मोठी मदत करत असल्याचे यशोदा सोमनाथ गुळवे यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Osmanabad, उस्मानाबाद

    पुढील बातम्या