अमरावती, 22 मे: राज्यातील अनाथ मुलांच्या (orphans) संदर्भात महिला आणि बालकल्याण विभागाने (Women and Child welfare) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 23 वयोगटापर्यंतच्या अनाथ मुलांना अनाथलयात राहता येणार (orphans up to the age of 23 can live in an orphanage) आहे. असा निर्णय घेणारा महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. यापूर्वी राज्यातील अनाथ मुलांना 18 वर्षांनंतर अनाथ आश्रमात राहू दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे या मुलांच्या तारुण्यावरही मोठा परिणाम होत होता.
अनाथलयातील मुलांना वयाच्या 23व्या पर्षांपर्यंत अनाथ आश्रमात राहू द्यावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती. त्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाने 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ मुला-मुलींना आश्रमात राहता येणार असा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रिलायन्स हॉस्पिटलने उभी केली लहान मुलांसाठी विशेष सुविधा
तसेच कोविड-19 संसर्गाच्या संकट काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविड मुळे 195 मुले अनाथ झाली आहेत. आई आणि वडील गमावलेली 108 बालके तर एक पालक गमावलेली 87 बालके आहेत.
कोविडमुळे अनाथ मुलांची संख्या
एकूण अनाथ मुले - 195
1 पालक गमावलेली - 87 मुले
दोन्ही पालक गमावलेली -108
कुठल्या जिल्ह्यात किती अनाथ मुले?
नंदुरबार - 93
हिंगोली - 18
जालना - 16
ठाणे - 11
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.