Home /News /maharashtra /

Anil Parab यांच्या अडचणीत वाढ, धाडीत मुरुड ग्रामपंचायतीतून ED च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे

Anil Parab यांच्या अडचणीत वाढ, धाडीत मुरुड ग्रामपंचायतीतून ED च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार आरोप करत होते.

    मुरुड, 29 मे: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार आरोप करत होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी (19 मे) अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड (Ed raids) टाकली. अनिल परब यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. याचदरम्यान वादग्रस्त साई रिसॉर्ट (Controversial Sai Resort) प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 26 जून 2019 ला अनिल परब यांनी साई रिसॉर्ट कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागलीय. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड ग्रामपंचायतमध्ये अनिल दत्तात्रय परब यांच्या नावाने 46 हजार 800 रुपये कर भरल्याचा पुरावा हाती लागला आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. BA.4, BA.5 Variant चा महाराष्ट्रात शिरकाव; समोर आली राजेश टोपेंची प्रतिक्रिया अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही अशा स्वरुपाचे वक्तव्य वारंवार केलं होतं. मात्र आता चक्क ईडीच्या हाती मूळ कागदपत्रे लागल्याने धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत साई रिसॉर्टच्या संबंधीत काही कागदपत्रे सादर केली होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांचा आरोप काय? साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टची बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परबने सदानंद कदमला 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला. डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचे घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Anil parab

    पुढील बातम्या