मुंबई 5 जुलै : मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तीन दिवसानंतर शुक्रवारी पूर्ण क्षमतेनं सुरू झालं. 2 जुलैला स्पाईस जेटचं एक विमान लँडींग करताना रनवेवरून घसरलं होतं. या विमानात 169 प्रवासी होते मात्र सुदैवानं त्यांना दुखापत झाली नाही. त्या घटनेनंतर विमानतळावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. काही काळासाठी मुख्य रनवे बंद करावा लागला होता. त्यामुळे शेकडो विमानांना फटका बसला.
मुंबईचं विमानतळ हे जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. मात्र या विमानतळावर फक्त दोनच धावटपट्ट्या असल्याने अनेकदा अडचण निर्माण होते. काही अपघात घडल्यास विमानांना दुसरीकडे वळवावं लागतं किंवा विमानफेऱ्या रद्द होतात.
तब्बल तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर हे विमान रनवेजवळून दूर नेण्यात आलं आणि रनवेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रनवे वापरण्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.
आईला नाश्ता करता यावा म्हणून मुलाने खेचली ट्रेनची इमर्जन्सी चेन!
Operation resumed at Runway-27 of Mumbai International Airport Limited (MIAL) at 4:47 pm. It was closed as SpiceJet SG 6237 aircraft that overshot runway on July 2 was stuck here; the disabled aircraft has been pulled out. pic.twitter.com/T9DY7ycLfw
— ANI (@ANI) July 5, 2019
नेमकं काय झालं?
मुंबई विमानतळावर 2 जुलैला सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली. जयपूरहून मुंबईला आलेल्या स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 54 विमान दुसरीकडे वळवण्यात आले आहेत. तर 52 विमान रद्द करण्यात आले आहेत.
स्विच ऑफ असलेल्या OnePlus स्मार्टफोनला मध्यरात्री लागली आग
गेल्या दोन दिवसात विमानतळावर झालेली ही दुसरी दुर्घटना आहे. याआधी रविवारी रात्री सुरत विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली होती. भोपाळवून सुरतला येणारे विमान धावपट्टीवरून घसरून सेफ्टी एरिया मध्ये गेले होते. विमानाला मोठा अपघात झाला असता पण ते चिखळात अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. वैमानिकाने विमानावरील नियंत्रण सोडले नाही त्यामुळे 47 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित राहिले.