मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरण; नवजात शिशूचा मृत्यू

अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरण; नवजात शिशूचा मृत्यू

(प्रतीकात्मक फोटो)

(प्रतीकात्मक फोटो)

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील एसएनसीयू विभागात रविवारी आग लागल्याची घटना घडली होती. व्हेंटिलेटरच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमरावती 26 सप्टेंबर : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील एसएनसीयू विभागात रविवारी आग लागल्याची घटना घडली होती. व्हेंटिलेटरच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं. दरम्यान ही बाब लक्षात येताच तातडीने एसएनसीयू विभागातील नवजात शिशूंना इतर ठिकाणी हलविण्यात आलं होतं. दरम्यान रात्री उशिरा यातील एका बालकाचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.

चंद्रपूर हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी तिथे 12 नवजात बाळं होती. यातील दोन बाळं ही आधीच व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान काल रात्री यातील एका बाळाचा मृत्यू झाला.

सदर मृत्यू झालेलं बाळ हे स्त्री जातीचं होतं. ते 11 दिवसांचं होतं आणि बाळाचं वजन असल्याने तसंच बाळ कमी दिवसांत झाल्याने तिची प्रकृती आधीच गंभीर होती. आग लागल्यानंतर बाळाला इतर ठिकाणी शिफ्ट करत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर योग्य पद्धतीने न मिळाल्याने या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र,बाळाच्या मृत्यूशी आगीचा काही संबंध नाही, असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे यांनी केला आहे.

मुंबईत घरं कोसळली, मोठी दुर्घटना, घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

घटना घडली त्यावेळी व्हेंटिलेटरने पेट घेताच सलमा खान या परिचारिकेने व्हेंटिलेटरवरील नवजात शिशूंना उचलून बाजूला केलं. आगीमुळे विभागात सर्वत्र धूर पसरला होता. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवलं आणि इथल्या बालकांना इतक ठिकाणी हलवलं. या विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून दोन व्हेंटिलेटर महिनाभरापूर्वीच प्राप्त झाले होते. याच नवीन व्हेंटिलेटरमधील एका व्हेंटिलेटरला आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Hospital Fire