Home /News /maharashtra /

Maharashtra Omicron Update: Omicron चा वेगानं पसार, देशातला प्रत्येक चौथा रुग्ण 'महाराष्ट्रा'तील

Maharashtra Omicron Update: Omicron चा वेगानं पसार, देशातला प्रत्येक चौथा रुग्ण 'महाराष्ट्रा'तील

Maharashtra Omicron Update: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनासोबतच (Corona Virus)आता ओमायक्रॉनचा (Omicron) कहरही वाढला आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनासोबतच (Corona Virus)आता ओमायक्रॉनचा (Omicron) कहरही वाढला आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा (corona in Maharashtra) आकडा दररोज 40 हजारांच्या पुढे जात आहे. तर ओमायक्रॉननंही सलग दुसऱ्या दिवशी 100 हून अधिक रुग्णांची नोंद केली आहे. शनिवारी राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 7 हजार 743 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 1 हजार 730 वर गेली आहे. म्हणजेच ओमायक्रॉनचा देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील आहे. यावरून महाराष्ट्रातील ओमायक्रॉन (Maharashtra Omicron Update) अपडेटशी संबंधित परिस्थिती समजू शकते. राज्यात एका दिवसात 879 लोक Omicron मधून बरे झाले आहेत. कोरोनाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 71 हजार 202 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या महाराष्ट्रात एका दिवसात 42 हजार 462 रुग्ण आढळले आहेत. तसेच 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा अशाप्रकारे देशातील प्रत्येक सहावा ते सातवा रुग्ण महाराष्ट्रातील आहे. देशात आतापर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 लाख 50 हजार 377 वर पोहोचली असताना, एकट्या महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 441 वर पोहोचली आहे. राज्यातील नागपूर-मुंबई-पुणे येथील ओमायक्रॉनची परिस्थिती वाईट राज्यात नोंदलेल्या 125 ओमायक्रॉन प्रकरणांपैकी 26 प्रकरणे इतर राज्यातील आहेत. त्यांचे जीनोम अनुक्रम फक्त राज्यातच केले गेले आहे. यापैकी 9 परदेशी नागरिकही आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या तपासात हे लोक समोर आले. आतापर्यंत 4 हजार 792 नमुने जीनोम स्कॅव्हेंजिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यापैकी 72 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 125 नवीन ओमायक्रॉन संक्रमित पैकी 39 नागपुरात आणि 24 मुंबईत आढळले आहेत. मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदरमधून 20 ओमायक्रॉन प्रकरणे समोर आली आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 11 प्रकरणे समोर आली आहेत. उर्वरित रुग्ण राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील उर्वरित राज्यातील ओमायक्रॉनशी संबंधित परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, अमरावतीमध्ये 9 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ठाणे जिल्ह्यात 7 प्रकरणे समोर आली आहेत. अकोल्यात 5 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील 3 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगरमध्ये 2-2 आणि नाशिक, कोल्हापूर शहर, लातूर, सातारा, ठाणे महापालिका आणि वर्धा येथे 1-1 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुंबई: ऑनलाईन पिझ्झा मागवणं महिलेच्या अंगाशी, बसला 11 लाखांचा गंडा दरम्यान, शनिवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली आणि ज्या दिवशी ऑक्सिजनची मागणी दररोज 700 मेट्रिक टन येण्यास सुरुवात होईल त्या दिवसापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या राज्यातील जनतेला आवाहन करताना त्यांनी लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असं म्हटले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra News

    पुढील बातम्या