Home /News /aurangabad /

सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा

सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा

Cyber Crime in Aurangabad: सर्वसामान्य नागरिकांना फसवण्यासाठी सायबर चोरटे विविध प्रकारचे फंडे वापरत असतात. त्यामुळे थोडाही निष्काळजीपणा झाला तर मोठा आर्थिक फटका (Financial fraud) बसण्याची शक्यता असते. अशीच एक घटना पैठण तालुक्यातील चणकवाडी येथे घडली आहे.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 16 जानेवारी: सर्वसामान्य नागरिकांना फसवण्यासाठी सायबर चोरटे (Cyber criminal) विविध प्रकारचे फंडे वापरत असतात. त्यामुळे थोडाही निष्काळजीपणा झाला तर मोठा आर्थिक फटका (Financial fraud) बसण्याची शक्यता असते. अशीच एक घटना पैठण तालुक्यातील चणकवाडी येथे घडली आहे. येथील एका सेवानिवृत्त फौजदाराला अज्ञात सायबर चोरट्याने तब्बल 10 लाखांचा गंडा (10 lakh fraud) घातला आहे. आरोपीनं फिर्यादी फौजदारास एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून बँक खातंच रिकामं (Bank account become empty) केलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी सेवानिवृत्त फौजदारानं पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी आर्थिक फसणुकीसह अन्य कलमाअंतर्गत अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. तुकाराम मोहिते असं फसवणूक झालेल्या 63 वर्षीय सेवानिवृत्त फौजदाराचं नाव आहे. ते पैठण तालुक्यातील चणकवाडी येथील रहिवासी आहेत. हेही वाचा-'25 दिन में डब्बल' च्या नादात बार्शीकरांना तब्बल 5 कोटी 63 लाखांना गंडवलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते याचं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खातं आहे. त्यांना एसबीआय बँकेचं ऑनलाइन अ‍ॅप डाऊनलोड करायचं होतं. त्यामुळे ते आपल्या गूगलवर सर्चिंग करत होते. दरम्यान त्यांना गुगलवर एसबीआय बँकेचा हेल्पलाइन नंबर मिळाला. मदतीसाठी फिर्यादीने संबंधित क्रमांकावर फोन केला. यावेळी समोरील व्यक्तीने आपण एसबीआय बँकेचा अधिकारी बोलत असल्याचं सांगितलं. हेही वाचा-दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत 3 वृद्धांचा खून करून केलं आगीच्या हवाली तसेच बँकेचं ऑनलाइन अ‍ॅप डाऊनलोड करायचं असेल तर तत्पूर्वी तुम्हाला 'ऐनी डेस्क' नावाचं अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल, अशी माहिती दिली. समोरील व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे फिर्यादीने आपल्या मोबाइलमध्ये 'ऐनी डेस्क' नावाचं अ‍ॅप डाऊनलोड केलं. हे अ‍ॅप डाऊनलोड करताच काही वेळात फिर्यादी मोहिते याचं बँक खातं रिकामं झालं आहे. अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या अकाऊंटमधून 10 लाख 24 हजार रुपये लंपास केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Cyber crime

    पुढील बातम्या