मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Truck Accident Highway : देव तारी त्याला कोण मारी,इतक्या भीषण अपघातातून ही ट्रक चालक बचावला

Truck Accident Highway : देव तारी त्याला कोण मारी,इतक्या भीषण अपघातातून ही ट्रक चालक बचावला

मुंबई, पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीकडे खंडाळा घाटात एक मालवाहू सिमेंट ने भरलेला ट्रक तीस फूट खोल दरीत पडला. (Truck Accident Highway)

मुंबई, पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीकडे खंडाळा घाटात एक मालवाहू सिमेंट ने भरलेला ट्रक तीस फूट खोल दरीत पडला. (Truck Accident Highway)

मुंबई, पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीकडे खंडाळा घाटात एक मालवाहू सिमेंट ने भरलेला ट्रक तीस फूट खोल दरीत पडला. (Truck Accident Highway)

  मुंबई, 07 ऑगस्ट : मुंबई, पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीकडे खंडाळा घाटात एक मालवाहू सिमेंट ने भरलेला ट्रक तीस फूट खोल दरीत पडला. या ट्रकमध्ये 40 टन सिमेंट असल्याने तोल न सांभाळता तो ट्रक उलटला. (Truck Accident Highway) त्यामुळे ट्रकची केबीन पूर्ण दबल्याने चालक ही त्या खाली चेपला गेला. दरम्यान दबल्या गेलेल्या ट्रक चालकाचा जीव वाचवणे अत्यंत महत्वाचे होते त्यामुळे रेस्क्यू टीमने येत त्यांना वाचवले होते. म्हणून परिसरात जोरदार चर्चा सुरू होती देव तारी ताल्या कोण मारी, इतक्या भीषण अपघातातून ट्रक चालक बचावला.

  दरम्यान या ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढायला रेस्क्यू टीमला मोठी कसरत करावी लागली, खंडाळा आणि खोपोली ठाकुरवाडी वळणावर चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला. जखमी चालकाला पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात महामार्ग पोलिसानी दाखल केले आहे. ज्यावेळी ट्रक दरीत पडला तेव्हा मोठा आवाज झाला त्यामुळे सर्वच रेस्क्यू यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. यात देवदूत रेस्क्यू,अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आली. याचबरोबर अनेक नागरिक, आय. आर. बी. कर्मचारी, खंडाळा, रायगड,महामार्ग पोलिसांनी मदत कार्य केल्याने त्याचा जीव वाचला आहे.

  हे ही वाचा : कोकणात पाच दिवस पावसाचे थैमान, ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबई, पुणे परिसरात येलो अलर्ट

  जुन्या मुंबई-पुणे हायवेवर अपघातांची मालिका

  जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अपघाताची शृंखला थांबता थांबेना. मुंबईतील एकवीरेंचे भाविक लोणावळ्यात एकविरा देवीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या गाडीला मागच्या दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने चार ते पाच वेळा पलटी मारली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा आरपीटीएस साठे मिसळच्या अवघड वळणावर हा अपघात घडला. झालेल्या या अपघातातील कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. कार भरधाव वेगात होती.

  हे ही वाचा :एसटी बसमध्ये घंटी वाजवणाऱ्या दोरीने गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, धुळे आगारातली घटना

  वळणावर आल्यामुळे कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरली आण 3 ते 4 पलट्या मारून थांबली. मात्र दैव बलवत्तर होतं म्हणून कारमधील प्रवासी सुखरूप वाचले. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Container accident, Khalapur accident, Mumbai News, Pune accident

  पुढील बातम्या