मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शाळा 1 मेपर्यंत सुरू राहण्याचा निर्णय रद्द - विनोद तावडे

शाळा 1 मेपर्यंत सुरू राहण्याचा निर्णय रद्द - विनोद तावडे

वार्षिक परीक्षा संपली की सुट्टी लागते आणि मग आठवतं ते मामाचं गाव. पण आता मामाच्या गावाला जाण्यासाठी थोडा उशीर होणार आहे.

  28 मार्च : महाराष्ट्र प्राधिकरणाचा निर्णय अधिकाऱ्यांना बोलवून रद्द केला जाईल. या निर्णयाची गरज वाटल्यास पुढच्यावर्षी याचा विचार करू, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. म्हणजे आता शाळा 1 मेपर्यंत सुरू राहण्याचा निर्णय रद्द केलाय.

  वार्षिक परीक्षा संपली की सुट्टी लागते आणि मग आठवतं ते मामाचं गाव. पण आता मामाच्या गावाला जाण्यासाठी थोडा उशीर होणार होता. कारण यंदापासून  पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मेपर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते.

  या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे. हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.

  पण या निर्णयाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तुर्तास हा निर्णय रद्द केला गेलाय.

  First published:

  Tags: Maharashtra, School