मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 'ओव्हरटाइम' नाही

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना 'ओव्हरटाइम' नाही

'ओव्हरटाइम'मुळे होणारा खर्च टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने ओव्हरटाइम न देण्याचा निर्णय घेतला आहे.

'ओव्हरटाइम'मुळे होणारा खर्च टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने ओव्हरटाइम न देण्याचा निर्णय घेतला आहे.

'ओव्हरटाइम'मुळे होणारा खर्च टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने ओव्हरटाइम न देण्याचा निर्णय घेतला आहे.

    12 एप्रिल : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका सुरुच ठेवलाय. यापुढे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईम बंद करण्यात आला असून भाडेतत्वारील बसेस बंद पडल्यास कंत्राटदाराला 5 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या 'ओव्हरटाइम'मुळे होणारा खर्च टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने ओव्हरटाइम न देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी या पुढे ओव्हरटाइम न करता ठरलेल्या वेळेतच शिस्तबद्ध काम करावे, अशी सूचना तुकाराम मुंढे यांनी दिले.

    विविध कारणांनी  पीएमपीएमएलमध्ये ड्रायव्हर, कंडक्टरची कमतरता भासते. त्यामुळे पुण्यात ओव्हरटाइम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. ओव्हरटाइममुळे पीएमपीएमएलवर अतिरिक्त ताण पडतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला नेमून दिलेल्या वेळेत त्याने शिस्तबद्ध काम केलं, तर ओव्हरटाइम करण्याची वेळ येणार नाही, असं  मुंढे यांचं म्हणणं आहे.

    त्याचबरोबर, भाडेतत्त्वावरील बस रस्त्यात बंड पडल्यास संबंधित बसला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 800 बसचा समावेश आहे. या बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाणही जास्त आहे. त्यावर उपाय म्हणून मुंढेंनी हा आदेश दिला आहे. या शिवाय ऑन ड्यूटी झोप काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

    First published:
    top videos

      Tags: PMPML, Tukaram mundhe