जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डीत ऑफलाईन दर्शन बंदच, आदेश येऊनही ज्येष्ठ नागरिक दर्शनाच्या प्रतीक्षेत

शिर्डीत ऑफलाईन दर्शन बंदच, आदेश येऊनही ज्येष्ठ नागरिक दर्शनाच्या प्रतीक्षेत

शिर्डीत ऑफलाईन दर्शन बंदच, आदेश येऊनही ज्येष्ठ नागरिक दर्शनाच्या प्रतीक्षेत

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश (No offline pass and entry for senior citizens in Shirdi Sai temple) देण्यास मुभा देणारा आदेश काढला असला तरी अद्याप शिर्डीच्या साई संस्थानाचे दरवाजे ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले झालेले नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 11 नोव्हेंबर: राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश (No offline pass and entry for senior citizens in Shirdi Sai temple) देण्यास मुभा देणारा आदेश काढला असला तरी अद्याप शिर्डीच्या साई संस्थानाचे दरवाजे ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले झालेले नाहीत. पुढील दोन ते तीन दिवसांत (Decision likely in next 2 days) याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं ऑफलाईन पास सुविधादेखील बंद ठेवण्यात आली असून जिल्हाधिकारी याबाबत कधी निर्णय़ घेणार, याची संस्थानालाही प्रतीक्षा आहे. ज्येष्ठ नागरिक दर्शनाच्या प्रतीक्षेत राज्य शासनानं आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना प्रार्थनास्थळांवर प्रवेशास परवानगी दिली नव्हती. गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार आता ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांचं लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झाले असतील, त्यांना मंदिरात प्रवेश देण्याची मुभा राज्य शासनानं दिली आहे. मात्र अद्याप शिर्डी संस्थानानं ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश सुरू केलेला नाही. आदेश आल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू व्हायला दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. हे वाचा-  OnePlus ब्लास्ट प्रकरण: कंपनी करणार उपचारांचा खर्च, Refund ही देणार ऑफलाईन पास बंदच शिर्डीमध्ये ऑफलाईन पास आणि प्रसादालय हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सध्या बंद आहेत. ऑफलाईन पास देणारं काउंटर सध्या बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाईन पासला परवानगी द्यावी, अशी विनंती साई संस्थानाने केली आहे. मात्र त्यावर अद्याप जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळालेली नाही. ही परवानगी लवकरात लवकर मिळावी आणि प्रसादालय सुरू व्हावं, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या ताज्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने का असेना, मात्र ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना शिर्डी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात