Home /News /maharashtra /

OnePlus ब्लास्ट प्रकरण: कंपनी करणार उपचारांचा खर्च, Refund ही देणार

OnePlus ब्लास्ट प्रकरण: कंपनी करणार उपचारांचा खर्च, Refund ही देणार

OnePlus मोबाईलचा स्फोट होऊन (OnePlus to pay for treatment of mobile blast victim in Dhule) जखमी झालेल्या धुळ्यातील तरुणाच्या उपचाराचा खर्च देण्याची तयारी कंपनीनं दाखवली आहे.

    धुळे, 11 नोव्हेंबर: OnePlus मोबाईलचा स्फोट होऊन (OnePlus to pay for treatment of mobile blast victim in Dhule) जखमी झालेल्या धुळ्यातील तरुणाच्या उपचाराचा खर्च देण्याची तयारी कंपनीनं दाखवली आहे. त्याचप्रमाणं मोबाईलचा पूर्ण रिफंड करण्याचं आश्वासनदेखील (Refund and Medical expenses) तरुणाला दिलं आहे. धुळ्यातील सुहित शर्मा नावाचा तरुण मोबाईलचा ब्लास्ट झाल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. माध्यमांनी त्याची दखल घेतल्यानंतर आता कंपनीनं त्याला नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे. काय आहे प्रकरण? महाराष्ट्रातील धुळ्यात सुहित शर्मा नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलचा स्फोट होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मांडीवर झालेल्या जखमांचे फोटोही ट्विट केले होते. आपल्या खिशातच स्मार्टफोनचा स्फोट झाल्याचं सांगत त्यांनी कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला होता. त्यानंतर कंपनीनं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून त्यांना नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे. शर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये फोन जळल्याचं दिसतंय. फोन खालच्या बाजूने पूर्णपणे फुटला आहे. फोनचा ब्लास्ट झाला त्यावेळी OnePlus Nord 2 पीडित व्यक्तीच्या खिशात होता. अशात अचानक स्फोट झाल्याने त्या व्यक्तीच्या मांडीला अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याभागातील संपूर्ण त्वचा निघाली आहे. वारंवार फुटतायत फोन यापूर्वी 1 ऑगस्ट दिवशी वनप्लस मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. पाच दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची माहिती अंकूर शर्मा यांनी दिली होती. तर 8 सप्टेंबर या दिवशीदेखील दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत मोबाईलचा ब्लास्ट झाल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, वनप्लस कंपनीने धुळ्यातील सुहित शर्मा यांचा फोन तपासणीसाठी मागवून घेतला असून त्यांना रिफंड देण्याचं आश्वासन दिलं आहे. या बाबीची अधिकृत घोषणा मात्र कंपनीनं केली नसून शर्मा यांच्याशी संपर्क साधत त्यांना हे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Mobile, Oneplus

    पुढील बातम्या