मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुरवठा मर्यादित होता, पण महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही, आरोग्यमंत्री टोपेंचा दावा

पुरवठा मर्यादित होता, पण महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही, आरोग्यमंत्री टोपेंचा दावा

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे.

मुंबई, 21 जुलै : महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Second wave of corona virus) ऑक्सिजनची मागणी (Demand of oxygen) मोठ्या प्रमाणात वाढली होती. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित (limited stock of oxygen) होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती (Hand and mouth situation) राज्यात होती. मात्र ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे.

काय म्हणाले टोपे?

कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन मर्यादित असल्यामुळे तो वाया जाणार नाही, याचीदेखील खबरदारी घेतली गेली, असं टोपेंनी सांगितलं आहे.

हे वाचा -मोदी सरकारचं नवं विधेयक, मुलांना पालकांच्या देखभालीसाठी द्यावे लागणार 10 हजार

अपघात झाले पण6 हजा...

नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना हा अपघात होता. मात्र त्या घटनेत गेलेले बळी हे ऑक्सिजनअभावी गेलेले बळी असं म्हणणं चुकीचं होईल, असं टोपे म्हणादेखले. तो एक अपघात होता आणि असे अपघात इतरत्र होऊ नयेत, याची खबरदारी घेण्यात आली होती, असं टोपे म्हणाले. राज्यात ऑक्सिजनचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करणारी यंत्रणा  यांच्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले. ऑक्सिजन लावलेला एखादा रुग्ण स्वच्छतागृहात जात असेल तरी तेवढ्या वेळेपुरताही ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जात होता, असं सांगत काटकसर केल्यामुळेच ऑक्सिजन सर्वांना पुरवता आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं प्रतिदिन 16 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला आणि यापुढेही ऑक्सिजनचा तुटवडा पडेल, याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Oxygen supply, Rajesh tope