मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nilesh Rane : 'नवाब मलिकांच्या प्रकरणामुळे शिवसेना साईडट्रॅकला', निलेश राणेंचा मोठा दावा

Nilesh Rane : 'नवाब मलिकांच्या प्रकरणामुळे शिवसेना साईडट्रॅकला', निलेश राणेंचा मोठा दावा

"सगळं प्रकरण पाहता दाऊद इब्राहिम याचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात, अशी शंका वाटते", असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

"सगळं प्रकरण पाहता दाऊद इब्राहिम याचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात, अशी शंका वाटते", असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

"सगळं प्रकरण पाहता दाऊद इब्राहिम याचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात, अशी शंका वाटते", असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

रत्नागिरी, 1 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या चार दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) सावधपणे साईडट्रॅकला झालीय, असा दावा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) ढेपाळले आहेत, असाही दावा निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

'नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

"राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे नुसताच राजीनामा घेऊन सोडून देण्यासारखं नाही. देशाच्या एक नंबरचा शत्रू असलेल्या दाऊद सोबत त्यांनी केलेला आर्थिक व्यवहार हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा माणसाला जेलमध्ये टाकून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे", अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

(Yashwant Jadhav यांच्या डायरीत नेमकं दडलंय काय? आयकर विभागाच्या धाडीत झाला मोठा खुलासा - सूत्र)

निलेश राणेंचा महाविकास आघाडीवरही निशाणा

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचा माणूस असलेला नेता नवाब मलिक यांचा संबध दाऊदची फ्रंटमॅन हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदशी येतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा माणसाला शरद पवारांनी थारा द्यायला नको. एवढं होऊनही महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांच्यासाठी रस्त्यावर बसतात हे फार धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही करतेय ते लोकांच्या लक्षात येतंय हे पवारांनी लक्षात घ्यायला हवं. मै झुकेगा नहीं म्हणायला नवाब मलिक हे काय युद्ध जिंकून आलेत का?", असा सवालही त्यांनी यावेळी केला.

'दाऊद इब्राहिमचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात'

"हे सगळं प्रकरण पाहता दाऊद इब्राहिम याचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात, अशी शंका वाटते", असा गंभीर आरोप यावेळी निलेश राणे यांनी केला. "अख्या मुंबईत 25 रुपये चौ.फुटाने कुठे जागा मिळते? हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने आम्हाला सांगावं", असे आव्हान करत निलेश राणे यांनी जोरदार टीका केली.

First published: