जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुढच्या 24 तासांत पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपणार; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुढच्या 24 तासांत पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपणार; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

फाईल फोटो

फाईल फोटो

राज्यातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यात सध्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. तर विदर्भात सलग तीन दिवस पावसाने ठाण मांडले होते. आता त्याठिकाणी पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मात्र, राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता हवामान खात्याने काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्याने काय म्हटले - राज्यातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. राज्यातील सातारा, पुणे, रायगड, पालघर नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबतचे ट्विट करत माहिती दिली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडूंब भरुन वाहत असुन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? जेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला तेव्हा याचा अर्थ असा होतो की हवामानाने आता अधिक खराब हवामानासाठी तयार रहावे अशी मागणी केली आहे. जेव्हा हवामान असे वळण घेते, ज्याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. खराब हवामानामुळे तुम्ही तुमच्या प्रवासासाठी, कामासाठी किंवा शाळेतील मुलांच्या प्रवासासाठी तयार राहा. हेही वाचा -  Mumbai Thane Rain Update : मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार, लोकल सेवा विस्कळीत तर राज्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे काही ठिकाणी  शेती पिकांना देखील फटका बसला आहे. तर वर्धा जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत असल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात