जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कौमार्यभंगाच्या संशयावरुन नवविवाहितेचा छळ, पतीसह सासरकडच्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

कौमार्यभंगाच्या संशयावरुन नवविवाहितेचा छळ, पतीसह सासरकडच्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Crime in Osmanabad: विवाहपूर्वीच तुझा कौमार्यभंग झाल्याचा आरोप करत (accusation of lost virginity before marriage) नवऱ्यानं आणि सासरच्या कुटुंबीयांनी विवाहितेचा अमानुष छळ केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उस्मानाबाद, 18 जून: महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या एका 23 वर्षीय विवाहित तरुणीचा एका अजब कारणामुळे सासरच्यांनी छळ (harassment) केला आहे. विवाहपूर्वीच तुझा कौमार्यभंग झाल्याचा  आरोप करत (accusation of lost virginity before marriage) नवऱ्यानं आणि सासरच्या कुटुंबीयांनी तरुणीला अमानुष वागणूक दिली आहे. याप्रकरणी पीडितनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पतीसोबतच सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा (FIR Lodged) दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या पीडित तरुणीचा अवघ्या एक महिन्यापूर्वी विवाह (marriage) झाला होता. लग्नाच्या एका महिन्यातच सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला आहे. विवाहापूर्वीचं तुझा कौमार्य भंग झाला असल्याचा संशय पतीनं व्यक्त केला. त्यामुळे सासरच्या मंडळीनं नवविवाहित तरुणीनं माहेरहून पैसे आणावेत, यासाठी छळ सुरू केला. सासू सासऱ्यसहित सासरकडील आठ लोकांनी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सासरच्या आठ जणांविरुद्ध भादवि 498 (अ), 109, 323, 504 आणि 34 अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून आरोपींची चौकशी केली जात आहे. आरोपी गुन्ह्यांत दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. हेही वाचा- पतीचं संतापजनक कृत्य; बनावट FB खातं काढून पत्नीचे अश्लील व्हिडिओ केले व्हायरल भारतातील एक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असताना, राज्यात अनेक ठिकाणी घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही कौमार्य भंग सारख्या गोष्टीवरून विवाहित महिलांचा छळ केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात