Home /News /maharashtra /

कार्यकर्त्यांकडून तुफान स्वागत, रोहित पवारांना गर्दीमुळे कार्यक्रमातून घ्यावा लागला काढता पाय

कार्यकर्त्यांकडून तुफान स्वागत, रोहित पवारांना गर्दीमुळे कार्यक्रमातून घ्यावा लागला काढता पाय

रोहित पवार यांनी माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला.

जळगाव, 24 जानेवारी : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सध्या जळगाव दौऱ्यावर असून जळगाव येथील राष्ट्रवादी कार्यालयात रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी युवा कार्यकर्त्यांनी सेल्फी घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करून बेशिस्तपणा केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आल्यावर रोहित पवार यांनी स्वतः माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला. रोहित पवार यांच्या जळगाव येथील राष्ट्रवादी कार्यालयात स्वागत समारंभाप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे खेवलकर, महानगर शहराध्यक्ष अभिषेक पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते. या नेत्यांनीही उपस्थित कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील कार्यकर्त्यांनी राज्यातील नेत्यांकडे दुर्लक्ष करत सेल्फी काढण्यासाठी आणि रोहित पवार यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्याना आवरता न आल्याने वरिष्ठ नेते चांगलेच हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात परिवर्तन झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचा दरारा होता, प्रशासनात वापर वेगळ्या पद्धतीने केला जायचा. टीव्ही मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्षातील काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हे त्यांची ताकद वापरून चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी पसरवत असतात,' असा हल्लाबोल रोहित पवार यांनी यावेळी केला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Rohit pawar

पुढील बातम्या