जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत' राष्ट्रवादीचा राम कदमांवर निशाणा

'मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत' राष्ट्रवादीचा राम कदमांवर निशाणा

सरकारच्या नियमांचे पालन करत गोविंदांची सण साजरा व्हावा असे आम्हाला वाटते देशातली सर्वात मोठी हंडी घाटकोपरची आहे. आम्हाला निमंत्रण का नाही?

सरकारच्या नियमांचे पालन करत गोविंदांची सण साजरा व्हावा असे आम्हाला वाटते देशातली सर्वात मोठी हंडी घाटकोपरची आहे. आम्हाला निमंत्रण का नाही?

Palghar Mob lynching Case: पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल: गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गावात जमावाने तीन साधूंची (Palghar sadhu mob lynching) हत्या केली होती. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी भाजप नेते राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना नोटीस बजावली आहे. साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस (mumbai police issued notice) बजावली असून घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून राम कदमांवर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटलं की, भाजप नेते राम कदम पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांड प्रकरण चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांच्या अपयशाचं प्रतीक आहे. राज्यात फोफावत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या बाबतीत ते अजिबात गंभीर नाहीत, असंही राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जाहिरात

राम कदमांना उद्देशून दुसऱ्या एका ट्वीटमध्ये राष्ट्रवादीने बोचरी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘करून करून भागले आणि देवधर्माला लागले, ही मराठीतील म्हण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जणाची नाही तर मनाची तरी बाळगावी.’ यावेळी राष्ट्रवादीने एक विशेष हॅश्टॅगही वापरलं आहे. त्यांनी ‘एक कदम कोरोना की ओर’ असा हॅशटग वापरला आहे. हे ही वाचा- राम कदमांना घराबाहेर पाऊल ठेवण्यास मनाई, मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस नेमकं प्रकरण काय होतं? 16 एप्रिल 2020 रोजी, 70 वर्षीय चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी आणि 35 वर्षीय सुशीलगिरी महाराज आपल्या 30 वर्षीय वाहन चालक निलेश तेलगडे सुरत याठिकाणी चालले होते. देशात लॉकडाऊन असल्यानं जागोजागी विविध निर्बंध होते. अशात गुरू श्री महंत रामगिरी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित साधु पालघर मार्गे जात होते. यावेळी रात्री दहाच्या सुमारास गडचिंचोले गावातून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि चोर समजून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणी दोन साधुंसह चालकाचा दुर्दैवी अंत झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , NCP , palghar , ram kadam , Tweet
  • First Published :
जाहिरात
जाहिरात