पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या आणखी एका गडाला हादरा, फलटणचे ‘राजे’ भाजपमध्ये जाणार?

पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या आणखी एका गडाला हादरा, फलटणचे ‘राजे’ भाजपमध्ये जाणार?

रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

फलटण, 19 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीत असलेली गटबाजी आणि पक्षात सुरू असलेली धुसफूस यामुळे रामराजे अस्वस्थ असल्याचं बोललं जातं आहे. यातूनच ही अस्वस्थता त्यांनी बोलून दाखवली आहे. तसंच पक्षप्रवेश करण्याबाबत रामराजेंची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे.

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली होती. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी याआधी प्रयत्न केला आहे. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले होते. रामराजे निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठ धक्का बसू शकतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी रामराजे नेमकी काय भूमिका घेतात, यावर सातारा जिल्ह्यातील राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत.

रामराजेंवर काय म्हणाले होते उदयनराजे?

वाद सोडवण्यासाठी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उदयनराजे रागाने बाहेर पडले होते. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे आणि रामराजेंमधील वादानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या उदयनराजेंनी चर्चेतून बाहेर पडत शरद पवारांचा निर्णय कोणताही असेल तो मला मान्य असल्याचं सांगितलं. तसंच आधी पिसाळलेल्यांनी आवरा असेही रामराजेंचे नाव घेता उदयनराजे म्हणाले होते.

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 04:35 PM IST

ताज्या बातम्या