ठाणे, 19 मार्च : मुंबईत सापडलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना NIAने अटक केली आहे. मात्र महाराष्ट्र एटीएसही या प्रकरणी तपास करत आहे. अशातच सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे (Strong evidence against Sachin Waze) असल्याचा दावा एटीएसने (ATS) कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एटीएसने तब्बल 4 पाणी अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.
सचिन वाझे यांचे कारनामे :
मुंबईत आढळलेल्या हिरव्या रंगांच्या गाडीप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. कारण वाझे यांना अटक झाल्यापासून रोज एक नवीन महागडी लक्झरी गाडी NIA जप्त करत आहे. त्यामुळे अशा महागड्या गाड्या घेण्याची सचिन वाझे यांची मोडस नेमकी काय? आणि सचिन वाझे यांचा फायनान्सर कोण? याची चौकशी करता NIA ने स्वतंत्र टीमच कामाला लावली आहे.
NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझे वापरत असलेल्या एका पेक्षा एक आलिशान गाड्या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण एका साधारण API म्हणजेच सह पोलीस निराक्षकाकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्याच कशा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. NIA ने आतापर्यंत सचिन वाझे वापरत असलेल्या 5 गाड्या जप्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATS, Sachin vaze