जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? अजितदादांसोबतच्या NCP बैठकीची Inside Story

जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? अजितदादांसोबतच्या NCP बैठकीची Inside Story

जितेंद्र आव्हाड-अजित पवार

जितेंद्र आव्हाड-अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असताना जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचीही चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 1 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असताना जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेबाबत चर्चा झाली. जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणुकीला तयार राहा, अशा सूचना ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकांआधी आपल्या अटकेचा डाव आखला जाईल, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांना अटक झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. ‘ऐन निवडणुकीच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र हे घटनाबाह्य सरकार करू शकतं, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता खंबीर आहेत, पण त्यांनी त्यांच्या मनातल्या शंका अजितदादांसमोर मांडल्या,’ असं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी सांगितलं. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची भीती वाटत असतानाच राष्ट्रवादीचे 22 माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यातल्याच एका नगरसेवकाला विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा मतदारसंघात उभं करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात