मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रायगडमधला राजकीय वाद, पालकमंत्री आदिती तटकरेंना शिवसेनेचा विरोध, वडील सुनील तटकरेंचा मोठा दावा

रायगडमधला राजकीय वाद, पालकमंत्री आदिती तटकरेंना शिवसेनेचा विरोध, वडील सुनील तटकरेंचा मोठा दावा

रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादावर आता आदिती तटकरे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादावर आता आदिती तटकरे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादावर आता आदिती तटकरे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रायगड, 18 फेब्रुवारी : रायगडमध्ये (Raigad) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) बिघाडी झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या विरोधात शिवसेनेचे (Shiv Sena) जिल्ह्यातील तीनही आमदार आक्रमक झाल्याचं दृश्य आहे. या तीनही आमदारांकडून आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी करण्यात आली आहे. रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादावर आता आदिती तटकरे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपले रायगडमधील शिवसेनेच्या तीनही आमदारांसोबत सौहार्दाचे संबंध असून यामागे शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याच्या हात असल्याचा दावा केला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांची सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. रायगडमधील तीनही आमदारांसोबत आमचे सौहार्दाचे संबध असताना यामागे सरकारमधील कोणीतरी मंत्री हे उद्योग करत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. रायगडमधील महाविकास आघाडीतल्या नाराजी विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

(राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे ढग; येत्या 2 दिवसात कोसळणार सरी, IMD कडून इशारा)

"आमचे शिवसेनेच्या तीनही आमदारांसोबत राष्ट्रवादीचे सौहार्दाचे संबंध आहे. पण कालचे वक्तव्य त्यांनी का केले? हे मलाही कळले नाही. यामागे सरकारमधील वरिष्ठ नेता काही उद्योग करतोय का? अशी शंका मला आहे. असे उद्योग करण्यापेक्षा सध्या महाविकास आघाडीसमोर भाजपने मोठी आव्हानं निर्माण केली आहेत, ती पेलण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे", अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

रायगडमध्ये जिल्हा नियोजनचा सर्वात जास्त निधी शिवसेनेच्याच वाट्याला देण्यात आल्याची भूमिका सुनील तटकरे यांनी दिली. तसेच गेले काही दिवस सुरु असलेल्या राजकीय गोंधळामुळे जनतेच्या विकासकामांचे मुद्दे, लोकांचे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झालीय. पालकमंत्री आदिती तटकरे या विकासकामांच्या निधी वाटपात भेदभाव करीत आहेत, तसेच प्रत्येक विकासकामात श्रेय घेत असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरुन पायउतार करण्यात यावे, अशी मागणी या तीनही आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये शिवसेनेची जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला. जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याची भूमिका शिवसेनेच्या तीनही आमदारांनी मांडली आहे.

शिवसेना आमदारांची नेमकी तक्रार काय?

पालकमंत्री कोणत्याही आमदाराला घेऊन चालत नाहीत. निधी देत नाहीत. विकासकामांच्या उद्घाटनाचा किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे शिवसेनेच्या तीन आमदारांना योग्य सन्मान दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. याशिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. मग पालकमंत्रीपद शिवसेनेच्या कोणत्यातरी एका आमदाराकडे देण्यात यावे, अशी मागणी सर्व शिवसैनिकांची आहे.

रायगड जिल्ह्यात शिवेसेनेचे तीन आमदार आहेत. पण तीनही आमदारांच्या निधीबाबत तक्रारी आहेत. विकास कामांसाठी आपल्याला पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तीनही आमदार पुढच्या दोन दिवसांमध्ये पालकमंत्री हटावची मगणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्रामध्ये सर्व शिवसैनिकांच्या स्वाक्षरी असणार आहेत.

First published: