मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानं ठाकरे गटासोबतच महाविकास आघाडीमध्ये देखील उत्साहाच वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचं आक्रमक व वाघासारख नेतृत्व आता पिंजऱ्याबाहेर पडले आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि चेतना संचारल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले खडसे? शिवसेनेचं आक्रमक व वाघासारखं नेतृत्व पिजऱ्याबाहेर पडलं आहे. संजय राऊत यांच्या सुटकेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि चेतना संचारली आहे. संजय राऊत हे बाहेर पडल्यने त्याचा फायदा हा केवळ शिवसेनेलाच नाही तर महाविकास आघाडीला देखील होणार आहे. तसेच समानाच्या माध्यमातून देखील त्यांचं मार्गदर्शन मिळेल असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राऊत यांचं भव्य स्वागत राऊत यांना जामीन मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. संजय राऊत यांचं जेलबाहेर येताच कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केलं. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर देखील कार्यकर्त्यांकडून उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांची ठाकरे गटाचे नवे चिन्ह असलेल्या मशाली हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया दरम्यान संजय राऊत जेलमधून बाहेर येताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता मी बाहेर आलो आहे बघू असे म्हणत त्यांनी एक प्रकारे विरोधकांना इशाराच दिला आहे. आम्ही पळणारे माणसं नाहीत. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर ठरवली आहे. आता मी बाहेर आलो आहे बघू, माझी तब्येत ठिक नसल्यानं मी नंतर प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सुधील मुनगंटीवार यांनी मात्र राऊत यांच्या जामीनानंतर झालेल्या जल्लोषावर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.