मुंबई, 31 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar Health Update) यांच्यावरील शस्त्रक्रिया अखेर यशस्वीरित्या पार पडली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने मंगळवारी सायंकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वास्तविक बुधवारी शरद पवार यांना रुग्णालयात अॅडमिट करून त्यांची शस्त्रक्रिया केली जाणार होती. पण अचानक पोटात दुखत असल्याने मंगळवारीच अॅडमिट करण्यात आले आणि त्यानंतर तात्काळ त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करत रात्री उशिरा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच इतर काही लोक उपस्थित होते. रात्री उशिरा शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिकृतरित्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. गॉल ब्लॅडरमधील स्टोन काढण्याची शस्रक्रिया झाली. अर्ध्या तासाची शस्रक्रिया होती. शरद पवारांची तब्येत स्थिर आहे. मात्र पुन्हा एक शस्रक्रिया पार पड़ेल. एक मोठा स्टोन होता. यामुळे वेदना होत असल्याने हा स्टोन काढ़ण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रात्री उशिरा ब्रीच कॅंडीमधील ज्या डॉक्टरांनी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली त्यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला आहे आणि आभार मानले आहेत.
Thanking Dr.Maydeo, Dr. Golwala, Dr.Pradhan, Dr.Daftary, Dr. Samdani, Dr. Tibrewala and Breach Candy Hospital Team 🙏🏻 Posted by Supriya Sule on Tuesday, 30 March 2021
यावेळी त्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील दिसत आहेत.