Home /News /maharashtra /

शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला विशेष सल्ला

शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला विशेष सल्ला

सचिनच्या या भूमिकेविषयी देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि सचिनला पहिल्यांदाच मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला.

पुणे, 6 फेब्रुवारी : देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग विदेशात पोहोचली आणि जगभरात लोकप्रिय असलेली पॉप स्टार रिहाना हिने या आंदोलनाविषयी ट्वीट केलं. रिहानाच्या या ट्वीटवर उत्तर देत भारतातील अनेक सेलेब्रिटींनी तिला भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला. यामध्ये भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचाही समावेश होता. सचिनच्या या भूमिकेविषयी देशभरात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि सचिनला पहिल्यांदाच मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला. याच संपूर्ण घटनाक्रमाविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केलं आहे. 'लता मंगशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे होत आहेत. त्यामुळे आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील,' असं वक्तव्य शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. काय होती सचिन तेंडुलकरची भूमिका? भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत आवाज उठवणाऱ्या परदेशी सेलेब्रिटींना सचिनने फटकारलं होतं. 'भारताच्या एकात्मतेवर गदा कदापी सहन होणारी नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, पण अंतर्गत मामल्यात सामील होऊ नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या', असं ट्वीट सचिन तेंडुलकरने केलं होतं. हेही वाचा - रतन टाटांना भारतरत्न मिळावं या मागणीसाठी सुरू आहे कॅम्पेन; त्यांनी अशी प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा जिंकलं मन दरम्यान, सचिनसह भारतातील अनेक क्रिकेटपटू आणि अभिनय क्षेत्रातील दिग्गजांनी शेतकरी आंदोलनाची बाजू घेणाऱ्या परदेशी सेलेब्रिटींवर टीका केली होती. भारतातील सेलेब्रिटींच्या या भूमिकेला काही लोकांनी समर्थन दिलं तर काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer protest, Sachin Tendulkar (Cricket Player), Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या