Home /News /maharashtra /

'सुशांतप्रकरणी CBIने काय दिले लावले, ते दिसले नाहीत', शरद पवार बरसले

'सुशांतप्रकरणी CBIने काय दिले लावले, ते दिसले नाहीत', शरद पवार बरसले

शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.

  पंढरपूर, 29 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. तसंच नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र अद्याप या आत्महत्या प्रकरणाच्या तपास पूर्णत्वास आला नसल्याने टीका करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे. 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे', असंही पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनीही दिली प्रतिक्रिया सुशांतसिंह प्रकरणात आता एनसीबीकडून ड्रग अँगलने तपास केला जात आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'केवळ 3 हायप्रोफाइल अभिनेत्रींच्या चौकशीतून अमली पदार्थांचा विळखा सुटणार नाही. त्यासाठी प्रकरणाच्या मुळाशी जायला लागेल. तरच आपण समाज व्यसनमुक्त करू शकू. ड्रग घेणाराच कोणी नसेल तर देणारे आपोआप संपुष्टात येतील.'

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Sharad pawar, Sushant Singh Rajpoot

  पुढील बातम्या